Mumbai : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या बंगल्यावर ‘ईडी’चा छापा

एमपीसी न्यूज – येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतील समुद्र महाल या बंगल्यावर काल (शुक्रवारी) रात्री अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकून तपासणी केली. कोट्यवधी रुपयांच्या कर्जवाटपामुळे ही बँक आर्थिक संकटात सापली आहे. 

अंमलबजावणी संचालनालयाने येस बँकचे संस्थापक राणा कपूर यांच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक पुरावे मिळविण्याच्या उद्देशाने ‘ईडी’ने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. या छाप्यामध्ये ‘ईडी’च्या हाती कोणते पुरावे लागले, हे मात्र अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.

राणा कपूर यांनी देश सोडून बाहेर जाऊ नये, यासाठी देखील दक्षता घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेची 800 कोटी रुपयांहून अधिक रक्कम या बँकेत अडकून पडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.