Committee Established: रॅपिड अ‍ॅण्टी बॉडीज चाचणी अभ्यासासाठी चार सदस्यीय समिती स्थापन

Mumbai: Establishment of four member committee for Rapid Antibodies Testing Study समितीला विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या किटचा अभ्यास करून दहा दिवसांत शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे.

एमपीसी न्यूज- आयसीएमआरने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपिड अ‍ॅण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या किटचा अभ्यास करून दहा दिवसांत शासनाला अहवाल सादर करावा लागणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, प्रा. डॉ. अमिता जोशी हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत.

असे असेल समितीचे कार्य

– आयसीएमआरने रॅपिड अ‍ॅण्टी बॉडी चाचण्यांसाठी शिफारस केलेल्या विविध चाचणी प्रणाली, किट यांचा अभ्यास करून त्यापैकी सर्वच अथवा निवडक चाचणी प्रणालीचा आणि किटचा राज्यात वापर करण्याची शिफारस करणे.

– या चाचण्या पोलीस, आरोग्य सेवेशी निगडीत संवर्ग, स्वच्छता कामगार, तसेच सामान्य जनता यांच्यावर करायच्या की निवडक संवर्गावर करायच्या याबाबत शिफारस करावी.

– शिफारस केलेल्या चाचण्या व किटच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वारस्य (EOI) मसुदा तयार करून आरोग्य विभागाला सादर करावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.