BNR-HDR-TOP-Mobile

Mumbai : जाधववाडी लघु पाटबंधारे प्रकल्पातील शेतकऱ्यांना मिळाला न्याय; राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नास यश

सिलिंग रद्द करण्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील जाधववाडी लघु पाटबंधारे प्रकल्पातील शेतकऱ्यांना आता न्याय मिळाला असून 1600 हेक्टर पेक्षा अधिक जमीनीवरील सिलिंग रद्द (लाभ क्षेत्रावरील शेरे वगळणे) करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

मावळ आणि खेड मतदारसंघात असलेल्या (इंदोरी, जांभवडे,सुदुंबरे, सुदवडी,कान्हेवाडी, येलवाडी, सांगुर्डी,खालूंब्रे,शिंदे) या गावातील प्रकल्पग्रस्तांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. 97 साली जाधववाडी प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमीनीवर शासनाने सिलिंग लावण्याचे धोरण निश्चित केले, त्यानंतर शेतकरी सातत्याने माझ्या हक्काच्या जमीनीवरचे सिलिंगचे शेरे करण्यासाठी प्रयत्न करत होते.

  • बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांनी आज मंत्रालय येथे याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, कृष्णा खोरे विभागाचे कार्यकारी संचालक जाधव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी पुणे भारत वाघमारे, अधिक्षक अभियंता चोपडे, ज्येष्ठ नेते संभाजीराव पवार, माजी सरपंच हेमलता मोरे, नवनाथ पवार, उमेश मोरे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अनेक वर्षापासूनची तेथील शेतकऱ्यांची ही मागणी होती. त्यास जलसंपदा मंत्रीद्वयांनी दिलेल्या सकारात्मक निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे बाळा भेगडे यांनी सांगितले. तसेच त्यांनी या निर्णयाबद्दल दोन्ही मंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले.

  • पवना धरण जमीनीची मोजणी
    मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांना देण्यात येणाऱ्या प्रायोजित जमीनीच्या मोजणीची मागणी देखील जलसंपदा मंत्री यांनी या बैठकीत मंजूर केली असून आठ दिवसात याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे वडीवळे मध्यम प्रकल्पाच्या प्रलंबित तृतीय सुधारित प्रशासकीय प्रस्तावास मान्यता देण्याबाबतही कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3