Mumbai : तबलिगी जमातच्या ‘त्या’ पन्नास जणांचा ठावठिकाणा लागेना; गृहमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

एमपीसी न्यूज – तबलिगी जमातच्या दिल्लीतील कार्यक्रमात महाराष्ट्रातील चौदाशेजण सहभागी झाले होते. त्यापैकी पन्नास जणांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. तसेच त्यांनी स्वतःहून काही संपर्कही साधलेला नाही, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच दिली. या लोकांनी ताबडतोब संपर्क करावा, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

तबलिगी जमात कार्यक्रमातील तेराशे पन्नास जणांचा शोध घेऊन त्यांना विलग करण्यात आले. उरलेल्या पन्नास जणांचे मोबाईल बंद आहेत. या लोकांनी स्वतःला पोलीसांच्या हवाली करावे आणि सरकारला प्रतिसाद द्यावा. त्यांनी असे न केल्यास त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.