Pune : मुंबई पाठोपाठ पुण्यातील ससून रुग्णालयातही तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड

एमपीसी न्यूज – मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालयात पहिल्यांदा तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आला. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग होता. त्यानंतर पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयात ही आता तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू केला आहे. पुढील काळात इतरही रुग्णालयांकडून ससूनचे अनुकरण होण्याची शक्यता आहे. ससून रुग्णालयातील नवीन 11 मजली इमारतीत हा वॉर्ड आहे. त्याचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते  बुधवारी (दि.16) झाले.

Maharashtra News : राज्यातील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडणार

रुग्णालयाने या वॉर्डमध्ये 24 बेड असून, दोन अतिरिक्त आयसीयू बेड आहेत. तृतीय पंथीयांवर उपचार करण्यास अनेक रुग्णालये नकार देतात. मात्र त्यांना ससूनमध्ये अतिशय सहजपणे उपचार मिळणार आहेत. या वॉर्डमधील कर्मचाऱ्यांना संवेदनशीलपणे वागण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपचाराची नवी दिशा ससूनमुळे खुली झाली आहे. पुढील काळात आणखी रुग्णालयात ही सुविधा होईल, असे अश्वासन शासनातर्फे देण्यात आले आहे.

तृतीयपंथीयांना उपचार घेण्यास अनेक अडचणी येतात. त्याचबरोबर त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात. आर्थिक कारणांमुळे बहुतांश तृतीयपंथीय उपचारांसाठी ससून रुग्णालयात जातात. तिथे आता त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात आल्याने त्यांना भेदभावाची वागणूक मिळणार नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.