BNR-HDR-TOP-Mobile

Mumbai : माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

0

एमपीसी न्यूज- राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार (वय 79) यांचे आज मुंबईत निधन झाले. मुंबईच्या हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून इनामदार यांची ओळख होती.

आपली कारकिर्द पणाला लावून त्यांनी पोलीस दलातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर सातत्याने हल्ला चढवला होता. गाजलेल्या जळगाव सेक्स स्कँडल प्रकरण अरविंद इनामदार यांनी यशस्वीपणे हाताळले होते. इनामदार यांची पोलीस महासंचालक म्हणून कारकिर्द गाजली.

HB_POST_END_FTR-A2

.