Mumbai: महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 124 वर!

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोनाने चौथा बळी घेतला आहे. वाशी येथे कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीचे कोरोनाचे तिन्ही बळी मुंबईतील आहेत. काश्मीरमध्ये श्रीनगर येथे एका 65 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने देशातील कोरोना बळींची संख्या 13 झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 649 झाला आहे.

मुंबई व ठाण्यात प्रत्येकी एक नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडा 124 वर जाऊन पोहचला आहे. राज्यात काल नवीन 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते.

वाशी येथे एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने तसेच मुंबई व ठाणे येथे प्रत्येकी एक नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like