Pimpri-Chinchwad : कत्तलीसाठी जनावरे पळवणाऱ्या मुंबईच्या टोळीवर मोक्का

एमपीसी न्यूज – कत्तलीसाठी जनावरे पळवणाऱ्या मुंबईच्या टोळीवर (Pimpri-Chinchwad) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोक्का ची कारवाई केली आहे.
मोशीन बाबू कुरेशी, शाहिद रहेमान कुरेशी, मोहम्मद अब्दुल रहमान कुरेशी, आशराफ सलमान कुरेशी, मोहम्मद आरिफ सलमान कुरेशी, सोहेल फारूक कुरेशी, राहुल पंडित उर्फ राहुल भैया उर्फ राहील महम्मद कुरेशी, मोशीन शरीफ कुरेशी, जाफर सुजितकुमार सुभाषचंद्र पाणीग्रही अशी मोक्काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
Maval : वनक्षेत्र विभागाच्या दुटप्पी भूमिकेमुळे अतिक्रमणात वाढ
मुंबईची एक टोळी रात्रीच्या वेळी पुणे जिल्ह्यात येऊन इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत जनावरांची चोरी करीत असे. या टोळीला पकडण्यात दिघी पोलिसांना यश आले आहे.(Pimpri-Chinchwad) एका कारच्या क्रमांकावरून तपास सुरु करून दिघी पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातील विविध भागात पाठलाग करून नऊ आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
त्यांच्याकडून 25 लाख 20 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये 14 गुन्हे उघड झाले आहेत. आरोपींचा खुनाचा प्रयत्न, दंगल, गाईंची चोरी, तस्करी अशा एकूण 29 गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळे आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.