Mumbai : दहावीचा भूगोलचा पेपर रद्द; नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द!

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे दहावीचा भुगोल आणि कार्य शिक्षण हे दोन पेपर रद्द करण्यात आले आहे आहेत, अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वीच्या दुसऱ्या सत्राची परीक्षाही रद्द केल्याची माहिती गायकवाड यांनी दिले.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता नववी आणि अकरावी यांची दुसऱ्या सत्राची परीक्षा न घेता पहिल्या सत्रात घेण्यात आलेल्या चाचणी प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यांकनानुसार त्यांचा पुढच्या वर्गात प्रवेश निश्चित केला जाणार आहे.

तसेच दहावीच्या रद्द केलेल्या पेपरच्या गुणांबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला प्रचलित व विहित कार्यपद्धतीबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.