-MPC-TOP-MOST-BANNER-I

Mumbai: मावळातील प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावा – शरद पवार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I
एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मावळ विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळके यांच्याकडून माहिती घेतली. मावळातील प्रलंबित कामांबाबत असलेल्या अडचणी दूर करून सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या बैठकीस आमदार शेळके यांच्या समवेत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व तळेगावचे ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल, संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे, चंद्रकांत नाईक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपव्यवस्थापक अनिल गोराड, रस्ते विकास महामंडळ अधिकारी आर.आर. सोनवणे व इतर अधिकारी उपस्थित होते.

मावळ मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ, महारेल,  संरक्षण खात्याशी संबंधित कामांचा आढावा तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांची व विकासकामांची सद्यस्थिती याची सविस्तर माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पवार यांना दिली.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, अपघात टाळण्यासाठी उड्डाणपूल, सेवा रस्त्यांचा प्रलंबित प्रस्ताव, कान्हे, मळवली रेल्वे उड्डाणपूल उभारणी, तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता, तसेच केंद्र सरकार संरक्षण खात्याशी संबंधित असलेला क्षेपणास्त्र विकास प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींच्या मोबदल्याचा प्रश्न, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प अशा विविध विभागांशी संबंधित व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांविषयी या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

प्रलंबित कामांमध्ये असलेल्या अडचणी कशा दूर करायच्या याबाबत पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या व लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्यास सांगितले.

या संयुक्त बैठकीमुळे रखडलेल्या अनेक कामांना गती मिळणार असून मावळ तालुक्याच्या विकासाला नव्याने ऊर्जा आणि गती देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत, असे आमदार शेळके यांनी सांगितले.
.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn