Mumbai : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयीन कार्यालयास आयएसओ नामांकन

एमपीसी न्यूज- राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या मंत्रालयीन कार्यालयास आयएसओ नामांकन प्रदान करण्यात आले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गिरीश बापट यांना सदर प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. मंत्रालयातील हे दुसरे आयएसयओ नामांकन प्राप्त मंत्री कार्यालय आहे.

शासनाच्या गतीशील, पारदर्शक व स्वच्छ प्रतिमेस अनुसरुन जनतेच्या वाढत्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रशासकीय शिस्त अवलंबिणे तसेच शासकीय कामकाजात स्मार्ट संकल्पना आणणे हा या नामांकन संदर्भातील मुळ उद्देश आहे. आयएसओचे प्रशिक्षण सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून कार्यालयीन सर्व प्रक्रियेचे यादी करुन गुणवत्ता व्यवस्थापन पदधतीचे निश्चितीकरण करण्यात आले. पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन बैठक व्यवस्था निश्चित करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने मंत्री कार्यालयाची कार्यालयीन कार्यपदधती ओळखून त्यासाठीचे प्रमाणित कार्यप्रणाली निश्चित करणे. अधिकारी / कर्मचारी निहाय कर्तव्य व जबाबदारी ठरवून त्यांचे अभिलेख तयार करणे, बैठक व्यवस्था, अभ्यागत व्यवस्था विविध संबंधित घटकांकडून अभिप्राय प्राप्त करुन घेणे अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.

ही प्रक्रिया मंत्री कार्यालयात राबविण्यात येत असल्याने प्रमाणित कार्यपदधती अधिकारी / कर्मचारी निहाय सोपविलेली जबाबदारी इत्यादी माहिती एकत्रित करणे व आयएसओसाठी आवश्यक प्रणालीमध्ये संकलित करणे हे मोठे काम मंत्री कार्यालयाने पूर्ण करुन आयएसओ नामांकन प्राप्त केले आहे.

मंत्री गिरीश बापट यांनी यावेळी आयएसओ नामांकन घेण्याचा उददेश सांगितला. ” प्रशासकीय कामकाज गतीमान होण्यासाठी, प्रशासकीय गुणवत्ता सुधारण्यासाठी, प्रशासकीय कारभार लोकाभिमुख तसेच मंत्री कार्यालयातील कार्यपदधती जबाबदाऱ्या निश्चित करण्यात याव्या यासाठी कार्यालयीन व्यवस्थापन महत्त्वाचे आहे असे मानून कार्यालयातील व्यवस्था नागरिकांसाठी पारदर्शक ठेवण्याचा मानस आहे” असे ते म्हणाले.

जनतेशी संपर्क वाढवून जास्तीत जास्त प्रश्न व तक्रारींचे निराकरण करणे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि औषध प्रशासन या विभागासंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेणे, या विभागासंदर्भातील सातत्यपूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीत वाढ करणे, पत्रव्यवहारातील सातत्य राखुन ही प्रकरणे पूर्णत्वास नेण्यावर भर देणे, शासकीय योजनांचे मूल्यमापन करुन योजनांच्या परिणामकारकतेत वाढ करणे हे या पदधतीतील ध्येय असल्याचे गिरीश बापट यांनी यावेळी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.