Mumbai : तळीरामांना खूशखबर; या झोनमध्ये सुरू होणार दारूची दुकाने, या आहेत अटी

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने आज (रविवारी) दुपारी सुधारित आदेश काढला आहे. त्यानुसार मद्यविक्रीची दुकाने, कुरिअर आणि रुग्णालयांच्या ओपीडी महापालिका क्षेत्रात सुरू राहतील. मात्र, अतिसंक्रमणशील भागात (कंटेनमेंट झोन) त्यांच्यावरील बंदी कायम राहणार आहे.

केंद्र व राज्य सरकारने नवीन आदेश जारी करतात रेड झोन सहित ग्रीन व ऑरेन्ज झोन मध्ये दारूची दुकान सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. या परवानगीमुळे तळीरामांना मोठा दिलासा मिळणार आहे. असे असले तरी कंटेनमेंट झोनमध्ये ही परवानगी मात्र नाकारण्यात आली आहे.

रेड झोनमध्ये मुंबई महामंडळ व पुणे महामंडळ येथे परवानगी देण्यात आली असली तरी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. सुधारित आदेशानुसार खालील तरतुदी दारूच्या दुकानाबाबत करण्यात आल्या आहेत.

# दारुच्या दुकानाबाहेर एकावेळी फक्त एकच व्यक्ती उभी राहू शकते.

# मॉल तसेच फुड प्लाझामधील दारुची दुकाने बंदच राहणार आहेत.

# एका लेनमध्ये अत्यावश्यक सेवेत न येणारी फक्त पाच दुकानेच सुरूच राहतील.

# दारूच्या दुकानांची वेळ ही स्थानिक प्रशासनाकडून तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन ठरवली जाणार आहे.

# कोणतेही रेस्टॉरंट अथवा बार सुरू होणार नाहीत.

# कंटेनमेंट झोनमधील दारुची दुकानं बंदच राहणार आहेत.

सर्व दुकानदारांना तसेच ग्राहकांना सोशल डिस्टंसिंग पाळणं बंधनकारक राहणार आहे. दारूच्या खरेदी विक्रीतून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. त्यामुळे दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. मात्र, वरील नियमांचे पालन करणे सर्व दुकानदारांना बंधनकारक राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.