Mumbai: गुड न्यूज! राज्यात एक हजारपेक्षा जास्त रुग्णांनी केली कोरोनावर मात

राज्यात नवे रुग्ण 811, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7,628, कोरोना बळींचा आकडा 323 वर

एमपीसी न्यूज – राज्यात आज नवीन 811 रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7 हजार 628 झाली आहे. राज्यात आज 22 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना बळींचा आकडा 323 झाला आहे. आज 119 रुग्ण बरे होऊन घरी गेले, राज्यात आजपर्यंत कोरोनामुक्तांची एकूण संख्या 1,076 झाली आहे.

आज राज्यात 22 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई येथील 13, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील चार येथे तर मालेगाव, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, धुळे व सोलापूर शहरात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 16 पुरुष तर सहा महिला आहेत. आज झालेल्या 22 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 11 रुग्ण आहेत तर आठ रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत तर तीन रुग्ण 40 वर्षाखालील आहे. या 22 मृत्यूंपैकी 13 रुग्णांमध्ये (59%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड- १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूची संख्या आता 323 झाली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 08 हजार 972 नमुन्यांपैकी 1 लाख 01 हजार 162 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटीव्ह आले आहेत तर 7 हजार 628 जण पॉझिटीव्ह आले आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे समूह सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार समूह प्रतिबंधित कृति योजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 555 संक्रमणशील क्षेत्र क्रियाशील असून आज एकूण 8,194 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३१ लाख ४३ हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात 1 लाख 25 हजार 393 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 8 हजार 124 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.