Mumbai : वाढदिसानिमित्त अभिनेता विकी कौशलवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

एमपीसी न्यूज : सध्याच्या तरुणींच्या दिलाची धडकन अभिनेता विकी कौशलचा आज ३२ वा वाढदिवस. विकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ‘मसान’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘संजू’, ‘राजी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणा-या विकीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

विकीचे वडील श्याम कौशलनी त्याच्या लहानपणीचा एक फोटो शेअर करत त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या फोटोत श्याम कौशल यांनी विकीला कडेवर उचलून घेतलं आहे. ‘हॅपी बर्थडे पुत्तर. तुला खूप खूप आशीर्वाद आणि प्रेम. देव तुला नेहमी खुश ठेवो. आता मी तुझ्या नावाने ओखळला जातो, याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे’, असं त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

श्याम कौशल यांनी इंडस्ट्रीत अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केलं. ‘बाजीराव मस्तानी’, ‘गुंडे’, ‘दंगल’ यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केलं.

विकीच्या भावानेही त्याच्यासाठी सुंदर पोस्ट लिहिली आहे. विकीसोबतचा बालपणीचा फोटो शेअर करत सनी कौशलने लिहिलं, ‘काहीच बदललं नाही. फोटो पेपरवरून फोनवर आला, बाकी काहीच बदललं नाही. तू २ फूट ६ इंचांवरून ६ फूट २ इंचांचा झालास, बाकी काहीच बदललं नाही. आपण आधी कूल होतो, आता ‘वेरी कूल’ झालो, बाकी काहीच बदललं नाही. मी डावीकडे होतो, तू उजवीकडे होतास, बघ काहीच बदललं नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा!’

विकी कौशल लवकरच ‘सरकार उधम सिंग’ यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. शुजित सरकार या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.