Mumbai : हरभजन सिंग माझ्या हातून वाचला तर वीरेंद्र सेहवाग खोटारडा; शोएब अख्तरचा धक्कादायक खुलासा (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – एका लाईव्ह चॅटमध्ये अख्तरनं सांगितले की, भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगला तो मारायला गेला होता. परंतु त्याच नशीब चांगलं होतं आणि तो वाचला. एवढेच नव्हे, तर वीरेंद्र सेहवागने सांगितलेला ‘बाप, बाप होता है’,चा किस्सा कधी घडलाच नसल्याचे तो म्हणाला.

हॅलो या सोशल नेटवर्किंग साइटवर बोलताना अख्तर म्हणाला की, मी हरभजन सिंगला मारायला त्याच्या हॉटेल रूममध्ये गेलो होतो. त्याच्या रुमची चावी पण मी बनवून घेतली होती. पण, त्याचं नशीब चांगलं होतं त्यामुळे तो वाचला. आमच्यासोबत खातो, लाहोरमध्ये फिरतो, आपली संस्कृती एक आहे.

आपण पंजाबी आहोत आणि आमची बदनामी करतोस? तेव्हा मी त्याला म्हणलो होतो की हॉटेल रुममध्ये येऊन मारेन. त्याला ही माहीत होतं, मी येऊन त्याला मारेन. तो त्या दिवशी मला भेटला नाही. एक दिवसानंतर माझा राग शांत झाल्यावर मला तो भेटला आणि माफी मागितली, असे शोएब अख्तर म्हणाला.

शोएब अख्तरने आणखी एक किस्सा सांगताना वीरेंद्र सेहवाग बरोबर हुक मारुन दाखव, असा किस्सा कधी घडलाच नसल्याचे त्यांने सांगितले. मुल्तान कसोटी पाकिस्तानविरुद्ध खेळताना विरेंद्र सेहवागने 309 धावांची खेळी केली होती. भारताकडून कसोटी त्रिशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला होता.

वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर फलंदाजी करताना स्ट्राईकवर असलेल्या वीरूला पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब वारंवार बाउंसर टाकत होता. तेव्हा वीरूने त्याला नॉनस्ट्राईकवर उभ्या असलेल्या तेंडुलकरला बाऊंसर टाकण्यास सांगितले. वीरू अख्तरला म्हणाला होता समोर बाप आहे, त्याला हुक मारण्यास सांग.

वीरेंद्र सेहवाग याने मुल्तान मधील सांगितलेला हा प्रकार कधी घडलाच नसल्याचे त्यांने स्पष्ट केले आहे. शोएब अख्तर नेहमी त्याच्या विधानामुळे प्रसिद्धित येत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने भारतीय संघाचा गोलंदाज प्रशिक्षक म्हणून काम करण्यास तयार असल्याची इच्छा देखील त्यांने बोलून दाखवली होती.

व्हिडिओ लिंक –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.