Mumbai : व्हीव्हीएस लक्ष्मणने शेअर केलेला दिव्यांग क्रिकेटपटूंचा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

विराट कोहलीने सुद्धा केले लाईक

एमपीसी न्यूज – भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजारहून अधिक धावा करणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मणने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत द्विव्यांग क्रिकेटपटू सराव करताना तसेच सामने खेळताना दिसत आहेत. 

‘व्यक्तीची इच्छा असेल तर क्षमता, दृढता आणि साहस यांना कोणी रोखू शकत नाही. या भावनेला सलाम’, असे कॅप्शन लिहून लक्ष्मणने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ कुठला आहे, याबाबत काही माहिती उपलब्ध नाही. मात्र, तो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पाहिला गेला असून त्याला 1 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे व  लाईक केले आहे.

या संपूर्ण व्हिडिओत अनेक द्विव्यांग खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दाखवले आहेत. काही जण गोलंदाजी करत आहेत, काही फलंदाजी तर काही क्षेत्ररक्षण करत असल्याचे दिसत आहे.

एखाद्या सद्रूढ खेळाडू सारखं हे खेळाडू उत्तम खेळाचे प्रदर्शन करताना दिसून येत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, फिरकीपटू हरभजन सिंग यांनी सुद्धा या व्हीडिओ ला लाईक केले आहे.

या खेळाडूंचे क्रिकेट पहिल्यानंतर नियमीत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना देखील आश्चर्य वाटेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like