Mumbai : नागरिकांनी घाबरून न जाता, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता घ्यावी – आरोग्यमंत्री

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये तसेच त्याचा प्रसार होऊ नये, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

कोरोनाचे दोन संशयित रुग्ण पुणे येथे आढळून आले असून दोघांवर उपचार सुरू झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे टोपे म्हटले. धुलिवंदनाचा सण साजरा करताना होणारी गर्दी नागरिकांनी टाळावी. सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता पाळावी. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा. मास्क ऐवजी तोंडाला रुमाल वापरावा, अशी सतर्कता बाळगावी, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या वाचा

पुण्यात आढळले कोरोनाचे दोन पॉझिटीव्ह रुग्ण

_MPC_DIR_MPU_II

https://mpcnews.in/maharashtra-reports-corona-virus-cases-pune-couple-who-returned-from-dubai-137387-137387/

धुळवड व रंगपंचमीचा आनंद आपल्या कुटुंबाबरोबरच लुटावा – डॉ. दीपक म्हैसेकर

https://mpcnews.in/pune-admistration-appeals-to-celebrate-holi-with-your-family-137400/

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आयटी कंपन्यांची कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सूचना

https://mpcnews.in/hinjawadi-on-the-background-of-corona-it-companies-ask-their-employees-to-work-from-home-137408/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.