Mumbai High Court rejects Arnab’s bail : मुंबई हायकोर्टाने फेटाळला अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामीन

एमपीसी न्यूज – आज (सोमवार) पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायलयाकडून गोस्वामी यांचा अंतरिम जामीन फेटाळण्यात आला. याआधी शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली होती. त्यावेळी निकाल राखून ठेवण्यात आला होता.

अर्णब गोस्वामी हे पुढील चार दिवसांत सत्र न्यायालयाकडे अंतरिम जामीनासाठी दाद मागू शकतील असे आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.

2018 सालच्या अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्या प्रकरणात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा आणि अटक अवैध ठरवावी, यासाठी गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

गुरुवार (5 नोव्हेंबर) आणि शुक्रवार (6 नोव्हेंबर) असे दोन दिवस उच्च न्यायालयाकडून निर्णय न आल्याने अर्णब गोस्वामी यांना तिसरी रात्रही पोलिसांच्या पहाऱ्यातच काढावी लागली होती.

दरम्यान, गोस्वामी यांना गुरुवारी (5 नोव्हेंबर) अलिबागच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, कोर्टाने गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यासंबंधीच्या आपल्या 11 पानी ऑर्डरमध्ये न्यायालयाने काही कारणं दिली आहेत.

अर्णब गोस्वामींना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना अलिबागच्या मराठी शाळेत ठेवण्यात आलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग नगरपालिकेच्या मराठी शाळेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तिथं कच्च्या कैद्यांचा विभाग तयार करण्यात आला आहे. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर कैद्यांना जिल्हा कारागृहात हलविण्यात येतं.

सध्या या शाळेच्या कोरोना विभागात 40 कच्चे कैदी असून त्यांच्यामध्येच अर्णब गोस्वामी यांना ठेवण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.