Mumbai : रेशनकार्ड धारक व रेशनकार्ड नसणाऱ्यांना सुद्धा मिळणार तीन महिन्यांचे अन्नधान्य मोफत

एमपीसी न्यूज – संचारबंदीच्या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने रेशनदुकानावर तीन महिन्यांचे अन्नधान्य मोफत उपलब्ध करुन देण्याची सोय केली आहे.

तसेच रेशनकार्ड नसले तरी लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याशिवाय कुठल्याही कुटुंबावर उपासमारीची वेळ येवू नये म्हणून एक फॉर्म रेशन दुकानावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फॉर्म भरुन दिला की प्रत्येकाला मोफत अन्न धान्य मिळणार आहे.

सध्याच्या परिस्थितीत एकही गरीब उपाशी राहू नये, यासाठी केंद्र सरकारने पुरेशी व्यवस्था केल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे दोन प्रमुख भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी गरिबांना कवच मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन महिन्यांपर्यंत गरिबांना 5 किलो अतिरिक्त गहू किंवा तांदूळ मोफत मिळणार आहे.

याचा फायदा 80 कोटी लोकांना होणार आहे. याशिवाय एक किलो डाळ मोफत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत आठ विभागांमध्ये शेतकरी, मनरेगा, गरीब विधवा-निवृत्त कर्मचारी-दिव्यांग, जनधन योजना-उज्ज्वला योजना, सेल्फ हेल्प ग्रुप (महिला), ऑर्गनाइज्ड सेक्टर वर्कर्स (EPFO),कन्स्ट्रक्शन वर्कर्स यांना डीबीटी योजनेमधून फायदा मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.