Mumbai: उपमुख्यमंत्री पवार यांच्या घोषणेनंतर दोन तासात ‘सारथी’ला मिळाले 8 कोटी रुपये

In two hours after the announcement of Deputy Chief Minister Pawar, 'Sarathi' got Rs 8 crore:दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेत 8 कोटी देत असल्याचे जाहीर केले होते

‘सारथी’ला 8 कोटी रुपये उपलब्ध केल्याचे पत्र निर्गमित

एमपीसी न्यूज – मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत ‘सारथी’ संस्थेला 8 कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन तासातंच सदर निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून तसे पत्र ‘सारथी’ संस्थेला पाठविण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णयक्षमता व झपाट्याने काम करण्यासाठी ओळखले जातात. यानिमित्ताने ते पुन्हा सिद्ध झाले आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी आज सकाळी 11 वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात खासदार छत्रपती संभाजीराजे व मराठा समाज प्रतिनिधींची बैठक घेतली.

दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेत 8 कोटी देत असल्याचे जाहीर केले.

त्यानंतर अवघ्या दोन तासात म्हणजे साडेतीनच्या सुमारास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने पत्र क्र.संकिर्ण 2019/प्र.क्र.117/महामंडळे, दि. 9 जुलै 2020 निर्गमित करण्यात आले.

त्याद्वारे सुमारे 7 कोटी 94 लाख 89 हजार 238 रुपये इतका निधी ‘सारथी’ संस्थेला तातडीने उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.