Mumbai : आयपीएल फ्रॅंचाईजीजने खेळाडूंचे पेमेंट थांबवले!

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे खेळ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. यापैकीच एक म्हणजे यावर्षी होणारा आयपीएलचा सीजनसुद्धा पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार कोरोना प्रसाराचा वेग लक्षात घेता पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व आयपीएलचे सामने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आयपीएल टिम फ्रॅंचाईजीने सर्व खेळाडूंचे पेमेंट सुद्धा थांबवले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टीम मॅनेजमेंट बीसीसीआयकडून येणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवून असून त्यानुसार खेळाडूंना पेमेंट करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

आयपीएल सामन्याची सुरुवात होण्यापूर्वी खेळाडू तसेच टीमचे कोच यांना एक आठवडा अगोदर कराराचे आगाऊ पेमेंट मिळणे अपेक्षित असते व उर्वरित पैसे सामने सुरू असताना दोन हप्त्यांमध्ये दिले जातात.

दरम्यान, कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वच अनिश्चित असल्याने कोच व खेळाडूंचे पेमेंट रखडले आहे. टिम कोच असणाऱ्या लोकांचा करार हा ‘खेळ नाहीतर पैसे नाही’ या करारावर अवलंबून असतो. तरीही खेळाडूंची बोली लावण्याच्या प्रक्रियेपासून कोच सक्रिय असतात. त्यामुळे त्यांच्या पगाराचा काही वाटा देणे अपेक्षित असते.

खेळाडूंचे मोठ्याप्रमाणात टेस्टिंग करून आयपीएलचे सामने खेळवले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया क्रीडा विश्वातून समोर येत आहे. दरम्यान, काही विद्यमान खेळाडूसुद्धा प्रेक्षकाविना सामने खेळविण्यास हरकत नसल्याचे सांगत आहेत. मात्र, काही स्तरातून यासाठी विरोधसुद्धा होत आहे. आयपीएलचे सीजनसाठी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे बीसीसी आयसीसीच्या ‘ग्रीन सिग्नल’ ची वाट पाहत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.