Mumbai: राज्यातील जनता कर्फ्यू पहाटे पाचपर्यंत वाढविण्याचा निर्णय

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर सुरू असलेल्या जनता कर्फ्यूची मुदत आज रात्री नऊ वाजता संपत असली तरी राज्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात जनता कर्फ्यूची मुदत पहाटे पाच वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार देशातील नागरिक आज सकाळी सात वाजल्यापासून जनता कर्फ्यूमध्ये सहभागी झाले आहे. एकूण 14 तासांच्या जनता कर्फ्यूची मुदत रात्री नऊ वाजता संपत आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात आज 11 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे राज्यातील कर्फ्यू आठ तासांनी म्हणजे पहाटे पाचपर्यंत वाढविण्यात येत आहे,  असे टोपे यांनी जाहीर केले. पहाटे पाचनंतर 31 मार्चपर्यंत राज्यातील शहरी भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना साथीवर मात करण्यासाठी राज्यात 31 मार्चपर्यंत लॉक डाऊनची घोषणा केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.