Mumbai : ‘क्या एकता और करण शादी कर रहे है’, नक्की बघा पुढील भागात…

एमपीसी न्यूज : मालिकांची राणी एकता कपूर आणि सिनेदिग्दर्शक करण जोहर ही दोन्ही बॉलिवूडमधील लोकप्रिय नावे आहेत. करणने आजवर अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे तर एकताने छोट्या पडद्यावरील अनेक हिट मालिकांची निर्मिती केली आहे. अजूनही ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकलेले नाहीत हेदेखील दोघांमधले साम्य. त्यांच्यात चांगले मैत्रीचे नाते देखील आहे. मग फिल्मी स्टाईलप्रमाणे ते दोघे ‘शादी के बंधन मे बंध गये तो क्या’…होय काही दिवसांपूर्वी ते दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते.

‘क’ या अक्षरांवरुन सुरु होणा-या सास-बहूच्या सिरीयल ही एकताची खासियत आणि तरुणाईला आवडणारे चुलबुले, लार्जर दॅन लाईफ पिक्चर ही करणची स्पेशालिटी.  करण जोहरने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला होता. ‘जर मला आणि एकताला योग्य पार्टनर नाही मिळाले तर आम्ही दोघं लग्न करु.

_MPC_DIR_MPU_II

माझ्या आणि एकताच्या लग्नाने दुसरं कोणी खूष झालं नाही झालं तरी माझ्या आईला नक्कीच आनंद होईल. कारण, जर मी एकताशी लग्न केले तर माझ्या आईला एकताच्या मालिकांमध्ये पुढे काय होणार हे आधीच कळेल’ असे करण मजेशीर अंदाजात बोलला होता. त्याचे हे उत्तर ऐकून सर्वजणांना हसू आले होते.

एकता आणि करण जोहर हे दोघेही खूप चांगले मित्र-मैत्रीण आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. नुकताच करणने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याचे केस पांढरे झाल्याचे दिसत होते. त्याच्या या ‘सॉल्ट अँड पेपर लुक’वर एकताने कमेंट करत ‘कसौटी जिंदगी कि ’ या मालिकेतील मिस्टर बजाजचा रोल करणला ऑफर केला होता.

‘माझी एक टीव्ही सीरिअल सुरु आहे. त्यातील मिस्टर ऋषभ बजाज या पात्राचे केस पांढरे आहेत. आम्ही मालिकेतील चेहरे बदलतच असतो. ‘तुला हवं तर तू प्लीज या टीव्ही सीरिअलमध्ये ये’ असे तिने कमेंटमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like