Article by Harshal Alpe : ओ मुंबई लोकल तेरा हुआ, अब पुणे लोनावला लोकल का क्या ?

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे) – मुंबईतील लोकल ट्रेन सेवा 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी काही अटींसह चालू होणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी तशी टीव्ही वरून जोरदार घोषणा केली. ही बातमी ऐकून मुंबईतील बरेचसे चाकरमाने, सर्वसामान्य व्यक्ती खूशही झाल्या. वेगवेगळ्या पातळीवर त्यांनी आपला आनंद ही व्यक्त केला. बर्‍याच मोठ्या प्रमाणात संमिश्र प्रतिक्रियाही उमटली, उशिरा का होईना पण लोकल चालू झाली हे महत्वाचे, नाही तर रोज आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचायचे कसे ? हा प्रश्न होताच, ज्यांना लोकल प्रवासाची परवानगी नव्हती त्यांचे खूप च हाल ही झाले होते, या निर्णयानंतर होणारा खर्च ही खूप कमी होणार आहे .

पण एक मिनिट विचार केल्यानंतर या निर्णयानंतर होणार्‍या परिणामांना, वाढत्या गर्दीचे नियोजन सरकार ने केलेले असेल च, या बद्दल विचार केलेला असेलच, आणि तो करावा ही मागणी सर्व सामान्यांची असेलच . दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्यांना च या सुविधे चा लाभ मिळणार आहे. आणि त्यामुळेच लसीकरण प्रक्रिया ही झपाट्याने करावी लागणार आहे, तिचा वेग आत्ता आहे त्यापेक्षा वाढवावा लागणार आहे. कुठल्याही सरकार साठी हे एक मोठे  आव्हानच आहे. सर्व सामान्यांसाठी हे शिव धनुष्य केंद्र आणि राज्य सरकारांनी योग्य समन्वय साधून उचलाव अस वाटत,मात्र ह्या एकूण निर्णयाचा विचार करता हा निर्णय जरा अर्धवट घेतलेला वाटतो .

मुंबई मध्ये जशी लोकल ही लाइफ लाइन आहे, प्रवासाचे महत्वाचे साधन आहे तसेच आपल्या मावळातील, पिंपरी चिंचवड भागातील लोकांचे प्रवासाचे सार्वजनिक साधन ही लोकल च आहे, हे पहिल्यांदा सर्वांनी विचारात घ्यावे, उद्योगध्ंद्यांचा विचार केला तर तिथे जाणार्‍या कामगारांचे, दूध विक्रेत्यांचे, खाजगी काम करून पोट भरणार्‍यांचे प्रवासाचे महत्वाचे साधन हे लोकल च आहे. शिवाय मावळ आणि पिंपरी चिंचवड मधून अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनीही याच लोकल मधून प्रवास करतात, एकेक तासाने लोकल असून सुद्धा प्रत्येक च लोकल ही या दृष्टीने आणि प्रवासी संख्येचा विचार करता म्हहत्वाचीच आहे.

लॉक डाउन मध्ये आधी च लोकांची आर्थिक गणिते ही विस्कटलेली आहेत, प्रत्येक च ठिकाणी वर्क फ्रॉम होम करणे शक्य नाहीये, त्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रत्येक वेळी खिशाला कात्री लागते आहे , बसेस ची संख्या आणि वेळ ही अत्यंत तुटपुंजी आणि थेट पुणे शहराला जोडत नसल्याने गैर सोयीची आहे. अशा वेळी मुंबईच्याच धर्तीवर, मुंबईचेच निकष संपूर्ण राज्यातील लोकलला लावून ती सुरू करणे गरजेचे आहे. निदान सुरवातीला दोन डोस झालेले प्रवासी तरी आपल्या कामाला व्यवस्थित जाऊ शकतील, निदान त्यामुळे येथील उद्योग चक्र अधिक गतिमान ही होईल. सगळ्या गोष्टींचा साधक बाधक विचार करून फक्त मुंबई पुरता विचार न करता या बाबतीत राज्यातील संपूर्ण जनतेचा विचार करावा एवढेच वाटते …

नाही तर या अर्ध्यानुर्ध्या निर्णयामुळे आमच्यावर “ओ मुंबई लोकल तेरा हुआ, अब पुणे लोनावला लोकल का क्या ?” असे म्हणायची पाळी येईल ……….

धन्यवाद ……  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.