Mumbai: लॉकडाऊनने आणले आई-मुलीला जवळ, सांगताना ‘ही’ अभिनेत्री झाली भावुक

Mumbai: Lockdown brings mother-daughter closer, saying 'this' actress became emotional

एमपीसी न्यूज – करोनामुळे अनेकाचे आयुष्यच बदलून गेले आहे. यावर सध्यातरी काही इलाज नसल्याने संपूर्ण देशातच नाही जगभरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत.  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माहिका शर्मा देखील लॉकडाऊनमुळे इंग्लंडमध्ये अडकून पडली आहे. पण या लॉकडाऊनचा एक वेगळाच फायदा माहिकाला झाला आहे. ज्याची तिने कल्पना देखील केली नव्हती. ती इंग्लंडमध्ये अडकून पडल्याने तिच्यात आणि तिच्या आईमध्ये जवळपास दोन वर्षानंतर पुन्हा एकदा संवाद झाला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माहिका तिच्या बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी तिने अॅडल्ट स्टार डॅनी डीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्या खासगी आयुष्यावरही याचा परिणाम झाला होता. तिच्या घरातल्यांनी तिच्याशी बोलणे बंद केले होते. गेल्या दोन वर्षांपासून माहिकाच्या आईने तिच्याशी बोलणे सोडले होते.

एका वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी माहिका इंग्लंडमध्ये फिरायला गेली होती. त्याचवेळी  करोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि माहिका तेथेच अडकली. ही गोष्ट माहिकाच्या आईला कळली. मात्र आपली लेक तिकडे अडकून पडली आहे हे कळताच त्यांना काळजी वाटू लागली. जवळपास दोन वर्षानंतर माहिकाच्या आईने तिला फोन केला असल्याचे म्हटले जात आहे.

या बद्दल सांगताना माहिका म्हणाली, ‘गेल्या दोन वर्षांपासून आई आणि माझे काही बोलणे झाले नव्हते. तिने मला सगळीकडे ब्लॉक केले होते. त्यामुळे मलाही तिच्याशी संपर्क साधता आला नाही. मी अडल्ट फिल्म स्टारला डेट करते असे तिला वाटले होते. पण मला फक्त त्याच्यासोबत चित्रपटात काम करायचे होते’ असे माहिका म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘जेव्हा माझ्या आईला कळले की मी तिकडे अडकले आहे, तेव्हा मात्र हे सगळे वाद ती विसरली.  तिला माझी काळजी वाटू लागली. तिने मला फोन केला आणि फोनवर रडू लागली. तिला मला लवकरात लवकर भेटायचे आहे असं ती म्हणू लागली. मला फार आनंद होत आहे आता सगळं काही ठीक होईल.’

करोनामुळे एका आई-मुलीची दोन वर्षांनंतर भेट झाली, त्याबद्दल त्याचे आभारच मानले पाहिजेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.