Mumbai: राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवणार  – मुख्यमंत्री ठाकरे

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवारी) राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. 14 तारखेनंतर 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवणार असल्याची ही घोषणा त्यांनी केली. या कालावधीत शेतीच्या कामाला सुट आहे.  जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कायम असणार आहे.  

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

 

एका विषाणूने तोंड बंद केले.

आकाश पांघरुनी जग शांत झोपले मात्र विषाणूने झोप उडवली.

मुंबई, पुण्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली.

रुग्ण वाढलेला भाग पुर्णपणे सील केला.

महाराष्ट्रात 33 हजाराच्या आसपास चाचण्या झाल्या.

मुंबईत 19 हजार चाचण्या, एक हजार कोरोना पॉझिटीव्ह, सौम्य, अतिसौम्य लक्षणे.

60 पेक्षा अधिक वयोमान असलेल्यांना जास्त धोका.

मधुमेह, किडनी, विकार असलेल्या रुग्णांना जास्त धोका.

घराबाहेर पडू नका, मास्क वापरा.

आम्ही पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मास्क लावले, तुम्ही सुद्धा लावा.

राज्यातील पहिला रुग्ण सापडलेल्या घटनेला सोमवारी पाच आठवडे.

कोरोनाच्या गुणाकाराचा वेग मंद करण्यात यश.

कोरोना संक्रमणाची साखळी तोडत आहोत.

राजकारण करु नका, आयुष्यात आपण राजकारणाशिवाय काय केले.

सर्व मुख्यमंत्री पंतप्रधानांसोबत आहोत.

एकजुटीने नक्कीच कोरोनावर मात करु.

वर्क फ्रॉम होम करा.

तुम्ही काळजी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो.

बंद राखण्यात स्वारस्य नाही, रुग्णांचा आकडा शुन्यावर आणायचा आहे.

महाराष्ट्राने चांगली हिंमत दाखविली, महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो.

आताही महाराष्ट्र देशाला आणि जगाला दिशा दाखविणार.

विषाणूची साखळी लवकर तोडली तर साखळदंडाला तोडू.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.