Mumbai : अखेर लुलीयाने लग्नाबाबतचे मौन सोडले

एमपीसी न्यूज : दबंग सलमान खान लग्न कधी करणार, हा प्रश्न त्याच्या फॅन्सना केव्हापासून पडला आहे. सध्या सलमान अभिनेत्री लुलीया वंतुरला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. याच निमित्ताने सलमानसोबत लग्न कधी करणार? असा प्रश्न लुलीयाला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर तिने दिलेले उत्तर काहीतरी वेगळेच सांगून जाते.

लुलीया म्हणाली, “कुठल्याही नात्यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांबाबत काय विचार करतात हे जास्त महत्वाचे आहे. मी आणि सलमान आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो. लग्नाचं म्हणाल तर माझी आई देखील अनेकदा मला हा प्रश्न विचारते.

परंतु, मला असं वाटतं की लग्न करणं जास्त महत्वाचं आहे की आनंदी असणं. अर्थात आनंदी असणं. कारण लग्न आणि आनंद यांचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे कोणासोबत लग्न करण्याचा अद्याप निर्णय मी घेतलेला नाही.”

बॉलिवूडचा दबंग खानची पेअर आजवर अनेक अभिनेत्रींबरोबर जोडली गेली आहे. अगदी सुरुवातीला तो संगीता बिजलानीला डेट करत होता. नंतर सोमी अलीशी मैत्री होती. त्याचे आणि ऐश्वर्याचे किस्से तर खमंगपणे चर्चिले गेले.

नंतर कतरिना कैफ, झरिन खान यांची नावे पुढे आली.  सध्या त्याच्या आणि लुलीयाच्या नावाची चर्चा आहे. त्यावर सलमानने मौन पाळले आहे. पण लूलीयाने दिलेले उत्तर चक्रावून टाकणारे आहे.

लुलीया एक रोमानियन अभिनेत्री आहे. ‘फ्रेमा’ आणि ‘डान्सेस पेत्रू टिने’ या दोन रिअॅलिटी शोमध्ये तिने काम केले आहे. ती एक उत्तम डान्सरदेखील आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.