Life Style : असा चेहरा बनवा घरच्या घरीच तजेलदार…

Make a face like Bright this at home

एमपीसीन्यूज : सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ब्युटीपार्लर बंद आहेत. त्यामुळे तिथे जाऊन ब्युटी ट्रीटमेंट घेणे शक्य होत नाही. अशावेळी काही घरगुती टीप्स फारच उपयुक्त ठरतात. अशाच काही उपयुक्त घरगुती टीप्सच्या माध्यमातून या उन्हाळ्यात तुम्ही तुमचा चेहरा तजेलादार ठेवू शकता.

चेहऱ्यावर अवेळीच सुरकुत्या आल्या किंवा डाग, पुरळ आले तर घाबरून जाऊ नये. यावर काही नैसर्गिक उपाय आहेत. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या कमी वयात येणाऱ्या सुरकुत्या नष्ट होतील आणि चेहऱ्यावरील तेज वाढेल.

चंदन – चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे चंदन. याचा लेप लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. यातील अँटिबॅक्टेरियल तत्त्व चेहऱ्यावर परिणाम करणारे बॅक्टेरिया नष्ट करून चेहरा उजळ बनवतात. या लेपामुळे चेहऱ्यावरील तेलग्रंथी कमी होते.

संत्र्याची साल – यातील ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशियम आणि कॅल्शियम चेहऱ्यावरील ब्लॅकहेड,  मृत पेशी,  पुरळ काढून टाकतात.

मुलतानी माती – याचा लेप चेहऱ्यावरील पुरळ घालवून चेहरा उजळ करतो.

लिंबू पाणी – लिंबू पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील मृत पेशी तसेच सर्व प्रकारचे डाग नाहीसे होऊन चेहरा नितळ होतो.

कोरफड – कोरफडीमुळे चेहऱ्यावरील मॉईश्चर वाढते, चेहरा साफ बनतो. चेहरा मऊ होऊन त्वचा लवचिक बनते.

या सर्वांबरोबर वारंवार चेहरा थंड पाण्याने धुतल्यास त्यावर प्रदूषणाचा काहीही परिणाम होत नाही. तसेच मेकअप केल्यास तो काढण्यास विसरता कामा नये. नाहीतर चेह-यावर परिणाम होतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.