Mumbai :’तान्हाजी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा; रघुनाथ कुचिक यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील शिलेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमी यशोगाथेवर आधारित असलेल्या ‘तान्हाजी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी राज्यमंत्री तथा किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे पत्राद्वारे केली आहे.

पत्रात म्हटले आहे कि, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील शिलेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमी यशोगाथेवर आधारित चित्रपट आहे. ‘स्वराज्यासाठी’ तानाजी मालुसरे यांनी स्वत:चे बलिदान देत स्वराज्य घडविण्यात खारीचा वाटा उचलेला होता. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य निर्मितीशी संबंधित असलेल्या एका प्रसंगावर ‘तान्हाजी’ चित्रपट निर्मित करण्यात आलेला आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज निर्मित स्वराज्य संबंधीचा इतिहास सर्वांना या चित्रपटाच्या माध्यमातून माहित होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे पत्राद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.