Mumbai: मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना

एमपीसी न्यूज – मनोज जरांगे पाटील आंदोलनास्थळावरून (Mumbai )मुंबईला निघाले आहेत. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

गेल्या पंधरा ते सोळा दिवसापासून मनोज जरांगे उपोषण करत आहेत . ते गाडीने मुंबईकडे जात असून त्यांच्या सोबत मराठा बांधवांचा मोठा जमाव आहे.

जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे. रात्रीपासून त्यांनी पाणीही न पिता कडक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मनोज जरांगे यांनी अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे

Bhosari : ट्रॅव्हल्सच्या धडकेत एकाचा मृत्यू

मनोज जरांगे  पाटील काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही.

 

त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले  होते.
छत्रपती समोर बसून सांगतो मी कुठल्याही पक्षाचा नाही. मी कोणत्याही पक्षाचे काम करत नाही. मी केवळ समाजाचा आहे. समाज माझा देव आहे आणि माझी समाजावर निष्ठा आहे. कुणी तरी मराठ्यांना हरवण्याचे स्वप्न बघत आहे. छगन भुजबळ यांना फडवणीस यांच्यामुळे अजित पवार यांच्याकडे जावे लागले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.