Mumbai : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन

एमपीसी न्यूज- ‘मोरूची मावशी’ या नाटकात मावशीची भूमिका अजरामर केलेले ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात निधन झाले. त्यांना फुफ्फुसाचा आजार होता. अस्सल विनोदांमधून त्यांनी रसिकांना खळखळून हसवले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट नाट्य क्षेत्रातील तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

विजय चव्हाण यांनी जवळपास 400 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या विनोदाचा वेगळा बाज होता. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजलेली नाटके. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.