Mumbai : डॉ. आंबेडकर जयंती निमित्त सह्याद्री वाहिनीवर दाखवणार आंबेडकरांवर आधारित मराठी चित्रपट

एमपीसी न्यूज – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर द अनटोल्ड ट्रुत्थ’ ही मराठी फिल्म दाखवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आला आहे.

जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट बुधवार (दि.14) डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे प्रक्षेपण दुपारी दीड वाजता सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने राजे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची प्रस्तुती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.