Mumbai: आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्या दिवाळी आणि सरकार स्थापनेच्या शुभेच्छा!

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साधणारे पिंपरी-चिंचवडमधील पहिले आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी (दि. २८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या तसेच सरकार स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या. मुंबईतील वर्षा या निवासस्थानी ही भेट झाली.

आमदार जगताप यांच्यासोबत स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, भाजप शहर प्रवक्ते व सरचिटणीस अमोल थोरात होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. त्यामुळे लोकांमधून सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले जगताप हे शहरातील पहिले आमदार ठरले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

आमदार जगताप यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रहाटणीत सभा घेतली होती. आगामी मंत्रिमंडळात आमदार जगताप यांचा समावेश असणार का, याबाबत पिंपरी-चिंचवडकरांमध्ये उत्सुकता आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना चांदीची गदा देऊन दुसऱ्यांदा सरकार स्थापनेस व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी संदर्भात आमदार जगताप यांच्याशी चर्चा करून घडलेल्या राजकीय घडामोडींची माहिती घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.