Mumbai : आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचा मंत्रिमंडळातील समावेश झाला आहे. त्यांनी आज (रविवारी) राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकारी, मान्यवर आदी यावेळी उपस्थित होते. 

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भेगडे यांना शनिवारी (दि. 15) दूरध्वनी करून त्यांना ही गुड न्यूज दिली होती. बाळा भेगडे सलग दुस-यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पुणे जिल्हा भाजपचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात भाजपने चांगली कामगिरी केली आहे. नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता आली आहे.

  • भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मावळला मंत्रिपद मिळावे, अशी भाजप कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही महिन्यांसाठी का होईना, मावळला मंत्रिपद मिळणार असल्याने मावळातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी काँग्रेसची सत्ता असताना 1988 च्या सुमारास मदन बाफना यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर प्रथमच मावळला मंत्रिपद मिळत आहे. तळेगाव दाभाडे शहरात प्रथमच मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमदार बाळा भेगडे यांना कोणते मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ :
कॅबिनेट मंत्री
1) राधाकृष्ण विखे पाटील
2) आशिष शेलार
3) संजय कुटे
4) सुरेश खाडे
5) डॉ. अनिल बोंडे
6) डॉ. अशोक उईके
7) जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)
8) तानाजी सावंत (शिवसेना)

  • राज्यमंत्री :
    1) योगेश सागर
    2)अतुल सावे
    3) संजय उर्फ बाळा भेगडे
    4) परिणय फुके
    5) अविनाश महातेकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.