Mumbai: बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंचा पुढाकार; पशुसंवर्धन मंत्र्यांसोबत मुंबईत बैठक

MP Amol Kolhe's initiative to lift the Ban on bullock cart racing; Meeting with the Minister of Animal Husbandry in Mumbai

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासोबत मुंबईत बैठक पार पडली. सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे, सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणीसाठी प्रयत्न केले जातील, असे मंत्री केदार यांनी सांगितले.

बैलगाडा शर्यत बंदी उठविण्याबाबत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज (गुरुवारी) मुंबईत बैठक आयोजित केली होती.

_MPC_DIR_MPU_II

बैठकीला शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, नरेंद्र पाटील, बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब आरूटे, नितीन शेवाळे, धनाजी शिंदे, संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, अमोल हरपळे आणि पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. परकाळे, सहआयुक्त डॉ. प्रशांत भड, अवरसचिव डॉ. सं. श्री. पंचपोर, सहसचिव माणिक गुट्टे आदी उपस्थित होते

राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल. राज्याचे महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.