Mumbai : एमएस धोनी कमबॅक करेल, अभिनेता सुनील शेट्टीला वाटतो विश्वास 

Mumbai : Actor Sunil Shetty is confident that MS Dhoni will make a comeback

एमपीसी न्यूज – 2019 च्या आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेतून भारत बाद झाल्यानंतर एमएस धोनीच्या करिअरबद्दल प्रश्न उपस्थित होवू लागले होते. एमएस धोनीने आता थांबायला हवे आणि निवृत्ती जाहीर करायला हवी, असा सूर सर्वस्तरातून उठत होता. धोनीने नेहमीच याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला, मात्र अभिनेता सुनील शेट्टीला धोनी कमबॅक करेल, असा विश्वास वाटतो.

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी सार्वजनिक केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता सुनील शेट्टी धोनीची पाठराखण करताना दिसून येत आहे. सुनील शेट्टी म्हणाला, धोनी फिट आहे आणि यावर्षी होणाऱ्या 20-20 विश्वचषक स्पर्धेत धोनी कमबॅक करेल, असे त्याने म्हटले आहे. आकाश चोप्रा यांनी येणाऱ्या 20-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपली निवडली होती त्याचप्रमाणे सुनील शेट्टी यांनी सुद्धा विश्वचषकासाठी एमएस धोनीसह स्वत:ची ‘प्लेइंग ईलेव्हन’ टिम तयार केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

या टीममध्ये सुनील शेट्टी याने रोहित शर्मा आणि केएल राहुल फलंदाजीसाठी सुरवातीला मैदानावर उतरतील, असे म्हणाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली तर चौथ्या नंबरला श्रेयस अय्यर असेल. मात्र यष्टीरक्षक म्हणून धोनीच योग्य असल्याचे सांगितले आहे. संजू सॅमसन आणि ऋषभ पंत धोनीची जागा घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

सुनील शेट्टी याने धोनीबद्दल विश्वास व्यक्त केला आणि म्हणाला, धोनी खूप मेहनत घेत आहे व तो नक्कीच चांगल्या फाॅर्ममध्ये कमबॅक करेल यात शंका नाही. यष्टीरक्षणासाठी संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांच्यापेक्षा धोनीच सरस आहे. धोनी टीममध्ये असेल तर टीम आणखी मजबूत होईल आणि सर्व क्रिकेट रसिकांची सुद्धा हीच इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

सॅमसन आणि पंत सुद्धा खुप मेहनती आहेत पण सॅमसनला जास्त संधी देण्याची गरज असल्याचं त्यांनी बोलून दाखवले. 2019 च्या विश्वचषकासाठी न्यूझीलंड विरूद्ध एमएस धोनी शेवटचा सामना खेळला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.