Mumbai: ‘नवरी नटली’ फेम लोककलावंत छगन चौगुले यांचे कोरोनामुळे निधन

Mumbai: 'Navari Natali' fame folk artist Chhagan Chaugule passed away due to corona

प्रसिद्ध लोककलावंत आणि ‘नवरी नटली’ फेम छगन चौगुले यांचं आज निधन झाले.  त्यांना करोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यातच त्यांचे आज (गुरुवारी) निधन झाले.

‘मांढरदेवी काळुबाईची कथा’, ‘आईचा गोंधळ’, ‘कथा खंडोबाची’ कथा चांगुणाची, कथा श्रावणबाळाची हे त्यांचे अल्बम प्रसिद्ध होते. त्यांनी लोककलेचे कोणतेही विशेष प्रशिक्षण घेतले नसले तरी ते मूळचे गोंधळी होते.

त्यामुळे गाणं हे त्यांच्या रक्तातच होते असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

ते मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागात जागरण गोंधळ शिकवत असत. त्यांना ‘खंडेरायाच्या लग्नाला, बानू नवरी नटली’ या गाण्याने विशेष ओळख मिळवून दिली.

कोणत्याही गॅदरिंगमध्ये या गाण्यावर हमखास नृत्य सादर केले जात असे. त्यानंतर त्यांनी अनेक कथा, आख्याने यांच्या कॅसेट काढल्या. खडा आणि मोकळा आवाज हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य होते.

त्यांना २०१८ साली लावणी गौरव पुरस्कार मिळाला होता. मात्र, करोनाने आज त्यांना आपला प्राण गमवावा लागला.

ऐका छगन चौगुले यांचे…. ‘नवरी नटली… सुपारी फुटली…’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.