Mumbai : राज्यात राष्ट्रवादी- भाजप सत्तेचे नवे समीकरण ! राष्ट्रपती राजवट अखेर मागे !

एमपीसी न्यूज-एमपीसी न्यूज- मागील एक महिन्यापासून कोणताही राजकीय पक्ष सत्ता स्थापन करण्यास तयार नसल्यामुळे १५ दिवसांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या बळावर सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट आज मागे घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. आज पहाटे ५ वाजून ४७ मिनिटांनी राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली तर सकाळी 8 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला.

तीन पक्षाची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना आज सकाळची प्रचंड मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हा धक्का दिला. महाविकास आघाडीचे सरकार प्रत्यक्षात येत असल्याचे दिसत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला जाऊन मिळाल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. या निर्णयानंतर शिवसेनेची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.