Mumbai: शेतकरी नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची ‘ऑफर’

NCP's Legislative Council's'offer' to farmer leader Raju Shetty

एमपीसी न्यूज – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेची ऑफर दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेट्टी यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी याबाबतचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याला शेट्टी यांनीही दुजारो दिला असून लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागांची लवकरच निवड होणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रत्येकी चार जागा येवू शकतात.

राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील एक जागा स्वाभिमानीला देणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीने शेट्टी यांना दिला आहे.

या भेटीबाबत वृत्तवाहिनीशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, ”गेली काही दिवस आईची प्रकृती खराब होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आईच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी घरी आले होते.

त्यावेळी बोलता बोलता ते म्हणाले लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या समझोत्याप्रमाणे विधानपरिषदेची एक जागा देण्याबाबत ठरल होते. त्यावेळी आम्हाला ती जागा देता आली नाही.

आता पवार साहेब कोकण दौ-यावरुन मुंबईत आल्यावर चर्चा करुन निर्णय घेण्याचा प्रयत्न करु. आठवड्याभरात पवार साहेबांसोबत बैठक होईल. त्यावेळी होय की नाही ते ठरेल.

राज्यपाल कोट्यातून आमदार निवडले जाणार आहेत. त्यामुळे त्यावर कोणता राजकीय शिक्का असणार नाही”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.