Mumbai: राज्यात दिवसभरात 113 नवे रुग्ण, 13 जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 748, मृतांचा आकडा 45!

एमपीसी न्यूज – राज्यात आज (रविवारी) कोरोनाबाधित 113 नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 748 झाली आहे. राज्यात नवीन 13 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 45 झाला आहे. आतापर्यंत 56 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात विविध जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

मुंबई – 406

पुणे – 103

ठाणे – 77

सांगली – 25

अहमदनगर – 20

नागपूर – 17

लातूर – 8

बुलडाणा – 5

औरंगाबाद – 5

यवतमाळ – 4

सातारा – 3

उस्मानाबाद – 3

रत्नागिरी – 2

कोल्हापूर – 2

जळगाव – 2

वाशिम – 1

सिंधुदुर्ग – 1

नाशिक – 1

हिंगोली – 1

गोंदिया – 1

आमरावती – 1

इतर – 60

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.