Mumbai: राज्यात 350 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 2,684 तर मृतांची संख्या 178 वर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज कोरोनाचे नवीन 350 रुग्ण सापडल्याने राज्यातील एकूण रुग्ण संख्या 2 हजार 684 झाली आहे. राज्यात आज 18 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा एकूण संख्या 178 झाली आहे. राज्यातील एकूण 259 करोनाबाधित रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. 

राज्यात आज 18 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईचे 11, पुण्यातील चार तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. एक मृत्यू राज्याबाहेरील नागरिकाचा आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 11 पुरुष तर 7 महिला आहेत. आज झालेल्या 18 मृत्यूपैकी 5 जण हे 60 वर्षांवरील आहेत 11 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर दोघेजण 40 वर्षाखालील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 18 जणांपैकी 13 रुग्णांमध्ये ( 72 %) मधुमेह. उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. या रुग्णांपैकी एकाला कॅन्सर तर एकाला क्षयरोग होता. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूची संख्या आता 178 झाली आहे.

प्रयोगशाळा तपासण्या

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 46,588 नमुन्यांपैकी 42,808 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 2,684 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना 

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात आज एकूण 5059 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 18.37 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

इतर महत्वाचे मुद्दे 

आजपर्यंत राज्यातून कोविड 19च्या 259  रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 67,701 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 5,647 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

तबलीगी जमातशी संबंधित 50 कोरोनाबाधित

निजामुद्दीन येथील बंगलेबाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी 50 जण करोनाबाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये आठ, यवतमाळ येथे सात, बुलढाणा जिल्ह्यात सहा, मुंबईत 14 तर प्रत्येकी 2 जण पुणे .पिपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील सहाजण अहमदनगर येथे तर एकजण पिपरी-चिंचवड येथे करोनाबाधित आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा त

पशील पुढीलप्रमाणे आहे – 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.