Mumbai : राज्यात 466 नव्या रुग्णांची भर, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 4,666 मृतांची संख्या 232 वर

एमपीसी न्यूज – राज्यात आज 466 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 4 हजार 666 वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक मुंबईत 3 हजार 032 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यानंतर पुणे शहरात 594 लोक कोरोना बाधित आहेत. आज राज्यात दिवसभरात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील सात मुंबईतील तर दोनजण मालेगाव येथील आहेत. राज्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 232 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत राज्यात 76 हजार 092 स्वॅब नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी 71 हजार 611 निगेटीव्ह आले तर 4 हजार 666 जण पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान,  मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून तो संपूर्ण राज्याच्या चिंतेचा विषय झाला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची व मृतांची विभागणी पुढीलप्रमाणे आहे.

मुंबई महानगरपालिका – 3032 (मृत्यू 139)
ठाणे – 20 (मृत्यू 2)
ठाणे महानगरपालिका – 134 (मृत्यू 2)
नवी मुंबई मनपा – 83(मृत्यू 3)
कल्याण डोंबिवली – 84 (मृत्यू 2)
उल्हासनगर – 1
भिवंडी, निजामपूर – 3
मिरा-भाईंदर – 78 (मृत्यू 2)
पालघर – 17 (मृत्यू 1 )
वसई- विरार – 107 (मृत्यू 3)
रायगड – 15
पनवेल – 33 (मृत्यू 1)
नाशिक – 4
नाशिक मनपा – 6
मालेगाव मनपा – 85 (मृत्यू 8)
अहमदनगर – 21 (मृत्यू 1)
अहमदनगर मनपा – 8
धुळे -1 (मृत्यू 1)
जळगाव – 1
जळगाव मनपा – 2 (मृत्यू 1)
नंदूरबार – 1
पुणे – 18 (मृत्यू 1)
पुणे मनपा – 594 (मृत्यू 49)
पिंपरी-चिंचवड मनपा – 51 (मृत्यू 1)
सातारा – 13 (मृत्यू 2)
सोलापूर मनपा – 21 (मृत्यू 2)
कोल्हापूर – 5
कोल्हापूर मनपा – 3
सांगली – 26
सांगली-मिरज मनपा 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 7 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा – 30 (मृत्यू 3)
जालना – 1
हिंगोली – 1
परभणी मनपा – 1
लातूर – 8
उस्मानाबाद – 3
बीड – 1
अकोला – 7 (मृत्यू 1)
अकोला मनपा – 9
अमरावती मनपा – 6 (मृत्यू 1)
यवतमाळ – 15
बुलढाणा – 21 (मृत्यू 1)
वाशिम – 1
नागपूर – 3
नागपूर मनपा – 67 (मृत्यू 1)
चंद्रपूर मनपा – 2
गोंदिया – 1
इतर राज्ये 13 (मृत्यू 2)

राज्यात आज म्हणजे 20 एप्रिलपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योग अंशत: सुरू करण्यात आले आहे. येथील उद्योगधंद्यांना अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुंबईतही काही कामांना परवानगी देण्यात येणार आहे. शहरातील कंटेनमेंट झोन वगळून बांधकाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग विषयक नियमांसह अन्य बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे. कामगारांची राहण्याची आणि दैनंदिन गरजांची सोय बांधकाम ठिकाणीच करणे बंधनकारक आहे. अटींचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.