Mumbai: राज्यात नवे 92 रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 1,666, एकट्या मुंबईत 1004 रुग्ण

राज्यातील कोरोना बळींची संख्या 110

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आज त्यात 92 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,666 झाली आहे. राज्यातील मृतांचा आकडा 110 वर जाऊन पोहचला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 31 हजार 841 कोरोना निदान चाचण्या घेण्यात आल्या आहेत. एकूण कोरोनाबाधित रुग्ण 1,666 आहेत. त्यापैकी 1,368 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 118 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. राज्यातील मृतांचा एकूण आकडा 110 झाला आहे.

राज्यात काल कोरोनाबाधितांची संख्या 1,574 होती. त्यात आज 92 ने वाढ झाली. एकट्या मुंबईत आज 72 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे. मुंबईतील संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. कालच्या दिवसात राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा 210 ने  वाढला होता. हा आतापर्यंतचा एका दिवसातील उच्चांक होता. मात्र, आज ही वाढ तुलनेत कमी असल्याचे दिसून येत आहे. नव्या रुग्णांमध्ये मुंबईतील 72, मालेगाव 5, ठाणे 4, औरंगाबाद, नाशिक व पनवेल येथील प्रत्येकी दोन तर, कल्याण-डोंबिवली, अहमदनगर, पुणे आणि वसई-विरारमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

राज्यातील जिल्हानिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

मुंबई – 1004

पुणे – 248

ठाणे – 135

सांगली – 26

अहमदनगर – 25

नागपूर – 19

औरंगाबाद – 17

बुलडाणा – 13

अकोला – 12

लातूर -8

पालघर व नाशिक – प्रत्येकी 7

सातारा – 6

रत्नागिरी व कोल्हापूर – प्रत्येकी 5

यवतमाळ, उस्मानाबाद, अमरावती – प्रत्येकी 4

रायगड, जळगाव – प्रत्येकी 2

वाशिम, सिंधुदुर्ग, जालना, हिंगोली, गोंदिया, बीड – प्रत्येकी 1

स्थलांतरीत व इतर – 107

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.