Mumbai News : अभिनेता रणबीर कपूर याला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. रणबीरची आई नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत या बाबत माहिती दिली आहे. रणबीर कपूरची प्रकृती ठीक नसल्याचे आणि त्याला कोराना झाल्याचे वृत्त आले होते. मात्र, अधिकृत माहिती मिळात नव्हती. नीतू कपूर यांनी स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

_MPC_DIR_MPU_II

‘तुम्ही दाखवलेली चिंता आणि शुभेच्छांसाठी आभार. रणबीरची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत आणि तो बरा होतोय. सध्या तो घरीच सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहे. सर्वजण काळजी घ्या,’ अशी पोस्ट नीतू यांनी शेअर केली आहे.

याआधी अभिनेत्री नीतू कपूर यांना देखील ‘जुग जुग जियो’ या सिनेमाच्या सेटवरच कोरोनाची लागण झाली होती. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात एकत्र झळकणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.