Mumbai News : ॲड. जय उभे यांचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने गौरव

एमपीसीन्यूज : अतिशय गरिबीच्या परिस्थितीवर मात करीत 50 हून अधिक विविध अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या खराळवाडी, पिंपरी येथील ॲड. जया उभे यांचा ‘दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन ॲवॉर्ड 2021’ ने नुकतेच गौरविण्यात आले.

फिल्मोरा मीडिया अँड एंटरटेनमेंटच्या वतीने मुंबईतील अंधेरी येथे आयोजित सोहळ्यात ॲड. उभे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अखिलेश सिंह म्हणाले, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ॲड. उभे यांचा दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन ॲवॉर्ड 2021ने सन्मान करण्यात आला आहे. महिला सशक्तीकरण हा या पुरस्कारामागचा मुख्य उद्देश आहे.

ॲड. उभे यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हा माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.

ॲड. उभे यांनी वयाच्या 35 वर्षांपर्यंत तब्बल विविध 50 शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करीत दोन विश्वविक्रमाला  गवसणी घालण्याची किमया साध्य केली आहे.

यापैकी 48 अभ्याससक्रमांची जागतिक विक्रमासाठी नोंद केली. त्याची दाखल घेत ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड आणि जिनिअस बुक ऑफ रेकॉर्ड  या दोन विश्वविक्रमांची नोंद झाली.

मराठीसह एकूण नऊ प्रादेशिक भाषांवर त्यांचे प्रभुत्व असून त्यांना शैक्षणिक पदव्यांमध्ये जागतिक दर्जाच्या ‘लिम्का’  आणि ‘गिनेस’  या दोन विश्व विक्रमांची नोंद करायची आहे. त्याही पुढे जाऊन जागतिक पातळीवर महिलांमध्ये सर्वांत जास्त शैक्षणिक पदव्या मिळविण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.