Mumbai News : अजितदादा यांचे ‘व्हिसी’द्वारे कार्यालयीन कामकाज सुरू !

एमपीसी न्यूज : गेल्या अनेक महिन्यांपासून फिल्डवर कार्यरत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे. असे असले तरी अजितदादांनी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून पूर्वनियोजित बैठका आणि कार्यक्रमांना व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे (व्हिसी) हजेरी लावत कार्यालयीन कामकाज नियमित सुरु ठेवले आहे.

आवश्यकतेनुसार व्हीसी व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या ते संपर्कात आहेत. शिवाय शासकीय निर्णय घेणे, अधिकाऱ्यांना सूचना देणे, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनामे आणि मदतकार्याचा आढावा घेणार आहेत.

तसेच प्रलंबित फायलींचा निपटारा करणे आदी कार्यालयीन कामे निवासस्थानावरुन नियमित व सुरळीत सुरु आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

या संदर्भातील पहिले वृत्त एमपीसी न्यूजने सर्वप्रथम दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III