Mumbai News : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी यांचे निधन
एमपीसी न्यूज – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटक केलेले फादर स्टॅन स्वामी (83) यांचे मुंबईतील भाद्रा रुग्णालयात निधन झाले आहे. स्टॅन स्वामी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा वैद्यकीय अहवाल ब्रीच कॅण्डी रुग्णालयातर्फे काही दिवसांपूर्वी हायकोर्टात सादर करण्यात आला होता.
स्टॅन स्वामी यांचा वैद्यकीय अहवाल रुग्णालयातर्फे उच्च न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर त्यांना पाच जुलैपर्यंत तेथेच ठेवण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. चार जुलै रोजी सकाळी स्वामी यांना कार्डिअॅक अरेस्टमुळे व्हेंटिलेटर ठेवण्यात आले. तेव्हा पासून बेशुद्ध होते. त्यानंतर दुपारी 1.24 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती हायकोर्टात देण्यात आली. तपास यंत्रणा आणि सरकारकडून त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात विलंब करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी स्वामी यांच्या वकिलांनी केली आहे.
Maharashtra | Bhima Koregaon accused Stan Swamy passes away in Mumbai's Bhadra Hospital, where he had been admitted. Details awaited.
— ANI (@ANI) July 5, 2021
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ‘एनआयए’ने स्टॅन यांना झारखंड येथून अटक करण्यात आली होती. स्वामी हे माओवादी आहेत तसेच त्यांना विविध आजार असल्याचा ठोस पुरावा नाही, असा दावा करत त्यांना जामीन मंजूर करण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विरोध केला होता. तसेच स्वामी यांची जामिनाची मागणी फेटाळण्याची मागणी केली होती. त्यानंतर जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी फेटाळला.