Mumbai News : अटल युवा मोर्चा कार्यालयात सदस्यता मोहिमेचे आयोजन

एमपीसी न्यूज – अटल युवा मोर्चा कार्यालय दादर, मुंबई येथे सोमवारी (दि.26) सदस्यता मोहिमेचे आयोजन केले होते. राष्ट्रीय अध्यक्ष सुधांशु मिश्रा यांच्या सूचनेनुसार सदस्यत्व अभियान राबवून संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अटल युवा मोर्चाचे सचिव नीलकंठ त्रिपाठी यांनी सांगितले.

सुधांशु मिश्रा लवकरच मुंबईत येऊन संस्थेच्या सक्रिय कामगारांचा सन्मान करणार असल्याचे नीलकंठ त्रिपाठी यांनी सांगितले.

सुधांशु मिश्रा म्हणाले, ‘लवकरच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटकमधील गरीब व मागासवर्गीय तरुणांच्या रोजगारासाठी फायदेशीर कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामुळे तरुण पिढी त्यांच्या क्षमतेनुसार स्वत:च्या पायावर उभी राहू शकेल. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील एक योजना बनवून काम करत आहेत. संघटनेच्या माध्यमातून सशक्त भारत घडविण्यासाठी अटल युवा मोर्चा पूर्ण ताकदीने कार्यरत आहे,’ असे मिश्रा म्हणाले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.