Mumbai News : ‘माझी सत्ता, माझी मनमानी’ शिवजयंतीच्या निर्बंधावरून भाजपची महाविकास आघाडी सरकारवर टीका

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. यावरून भारतीय जनता पक्षाने सरकारवर टीका केली आहे. सभा घेण्यासाठी कोरोनाची भिती नाही, नियमांची गरज नाही मात्र, शिवजयंतीसाठी अनेक निर्बंध लादले गेले आहेत. ‘माझी सत्ता, माझी मनमानी’ अशा पद्धतीने सरकार वागत असल्याची टीका भाजपने केली आहे.

भाजप महाराष्ट्र या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या व्हिडिओत राष्ट्रवादीच्या परिवार संवाद आधावा बैठिकीची चित्रफित दाखवण्यात आली आहे. व्हिडिओत पुढे हम करे सो कायदा, असं स्वत:च्या सोयीने नियम बनवणारे राज्य सरकार आहे.

कोरोनाचे कारण देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. शिवरायांच्या जयंतीला कोरोना संसर्गाचा धोका तो यांच्या सभेला नसतो का असा सवाल या व्हिडिओत उपस्थित करण्यात आला आहे. पुरोगामी पडद्यामागे लपून द्वेषाचे राजकारण करणे हे सरकार कधी थांबवणार असे या व्हिडिओत म्हंटले आहे.

दरम्यान, शिवजयंतीच्या उत्सवाला कोरोनच्या काळात किती जण हजर असावेत यावरून वादंग उठल्यानंतर अखेरीस राज्य सरकारनं एक पाऊल मागे घेत आता 10 जणांच्या जागी एका कार्यक्रमात 100 जण उपस्थित राहू शकतील असा सुधारित आदेश काढला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.