Mumbai News: छगन भुजबळांकडून पार्थची पाठराखण, म्हणाले ‘नया है वह’

Mumbai News: Chhagan Bhujbal commented on parth pawar शरद पवार यांनी सांगितल्यावर मी पुन्हा त्यावर काही बोलण्याची गरज नाही. शरद पवारांनी ते थोडे अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे.

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार याला जाहीररित्या खडेबोल सुनावल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. ‘नया है वह’ असे म्हणत त्यांनी पार्थची पाठराखण केली. तसेच यामुळे अजित पवार किंवा इतर कोणीही दुखावले गेलेले नाही, असेही ते म्हणाले.

पार्थ पवार प्रकरणावर भाष्य करताना छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार यांनी सांगितल्यावर मी पुन्हा त्यावर काही बोलण्याची गरज नाही. शरद पवारांनी ते थोडे अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे. हिंदीत सांगायचे झाले तर ‘नया है वह’ अस म्हणत त्यांनी पार्थची पाठराखण केली आहे.

आम्हीसुद्धा पवार कुटुंबाचे सदस्य आहोत. अजित पवार किंवा इतर कोणीही दुखावल गेले नाही. आम्ही सगळे एकत्रित आहोत. कुटुंबातील सदस्यांना बोलण्याचे, सुचवण्याचे, समजावण्याचे काम वरिष्ठ माणसे करतच असतात, असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दांत बुधवारी फटकारले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.